Tuesday, July 16, 2024

आज गुरुपौर्णिमा उत्सव ; मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित रहा; जयंत गुजर यांनी केले आवाहन- जुने कृष्णाबाई कार्यालयात होणार गुरुपौर्णिमा उत्सव;

वेध माझा ऑनलाइन।
प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव येत्या 21जुलै रोजी पंतांचा कोट जुने कृष्णाबाई मंगल कार्यालय सोमवार पेठ कराड याठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार असल्याची माहिती जयंत गुजर यांनी दिली

ते म्हणाले... येत्या 21 तारखेला पहाटे 5 वाजून 15 मिनिटाने साईबाबांची काकड आरती होईल, 6 वाजता अभिषेक होईल,सकाळी 7 वाजता श्री सत्यनारायण पूजा होईल, 

सकाळी 9 वाजता साई स्तवन मंजिरी चे वाचन होणार आहे व दुपारी 12 वाजता बाबांची माध्यान आरती होईल, त्याचवेळी तिर्थप्रसादाचे वाटप देखील होणार आहे
दुपारी साडेबारा ते सायंकाळी 4,30 पर्यंत महाप्रसादाचा लाभ भक्तांनी घ्यायचा आहे
सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी धुपराती होईल तर रात्री 10 वाजता शेजारती होणार असल्याची माहिती जयंत गुजर यांनी दिली

दरम्यान जयंत गुजर हे गेली कित्येक वर्षे गुरुपौर्णिमा उत्सव साईकृपेने कराडमध्ये साजरा करत आहेत या उत्सवास शहर व परिसरातील तसेच विविध ठिकाणाहून भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात याहीवर्षी भक्तांनी मोठ्या संख्येने
या उत्सवास सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन जयंत गुजर व समस्त कुटुंबीयांनी केले आहे

No comments:

Post a Comment