वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीचे तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येत आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेचा राग मनात धरुन मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करतानाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता. यावरुनच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे.
अमोल मिटकरी यांनी काल वक्तव्य केलं होतं. यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात आले होते. ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसेचे कार्यकर्तेदेखील होते. अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
No comments:
Post a Comment