Saturday, July 13, 2024

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कराडात मेळावा ; आमदार भास्कर जाधव यांच्या समोर सांगली पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात झाला आपसात राडा; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।
कराड येथे आमदार भास्करराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा, सांगली जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यात सांगली जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आपसात खडाजंगी झाली. यावेळी त्यांच्यापैकी एकाने त्यांच्यापैकीच एका कार्यकर्त्यांच्या कानाखाली मारली.हा सर्व प्रकार भास्कर जाधव यांच्यासमोरच घडला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सातारा सांगली जिल्ह्याचा जिल्हास्तरीय मेळावा आज दुपारी कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृहात पार पडला. या मेळाव्यास पक्षाचे विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर जाधव यांची विशेष उपस्थिती होती

दरम्यान या मेळाव्यात पक्ष वाढीबाबत मार्गदर्शन सुरू असताना. आमदार भास्कर जाधव यांच्यासमोरच सांगलीच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात  वादावादी झाली. पुढे हा वाद वाढत गेला आणि मग त्यापैकी एकाने त्याच जिल्ह्याच्या दुसऱ्या एकाच्या कानाखाली लगावली या  प्रकारानंतर सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

No comments:

Post a Comment