Wednesday, July 24, 2024

पाईपलाईन टाकण्यासाठी 71 लाखाचा पालकमंत्री देसाई यांच्याकडून तातडीने निधी मंजुर : राजेन्द्र यादव यांच्या पाठपुराव्याला यश ;



वेध माझा ऑनलाइन।

कराड शहरास वारुंजी जॅकवेलमधून पाणीपुरवठा करणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनेतील 600 मिलिमीटर व्यासाची अशुद्ध पाणी दाबनलिका कोयना नदीपात्रामध्ये नादुरुस्त झाल्याने शहराचा पाणीपुरवठा दिनांक 14 जुलै पासून खंडित झाला होता. 

कराड शहरास तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यासाठी शिवसेना नेते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा केली होती. तर कराडला कोयना बँकेत भेटून निवेदन दिले होते. त्यानंतर  पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समिती मधून लागेल तेवढा निधी देण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सूचना दिल्या होत्या. 

त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 मधील कोयना नदी पुलाच्या फुटपाथ वरून तात्पुरती व्यवस्था म्हणून पाईपलाईन टाकण्यासाठी  रुपये 71 लक्ष च्या कामास दिनांक 23 जुलै 2024 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पालकमंत्र्यांनी कराडच्या पर्यायी पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल राजेंद्रसिंह यादव यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कराड करांच्या वतीने आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment