Wednesday, July 17, 2024

आज संध्याकाळी कराडात पाणीपुरवठा होणार ; जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित ; पालिका सी ओ शंकर खंदारे यांची वेध माझा ला माहिती ;

वेध माझा ऑनलाइन।
पाईपलाईन वाहून गेल्यानं गेली पाच दिवस बंद असलेला पाणी पुरवठा बुधवारी सायंकाळपासून सुरळीत होणार आहे.अशी माहिती शंकर खंदारे यांनी वेध माझाला दिली 

राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणांतर्गत सध्या नवीन कोयना पुलाजवळ विस्तारीत पुलाचं काम सुरू आहे. पुलाच्या पिलरसाठी नदीपात्रात एका बाजूला भराव घालण्यात आला होता. शनिवार, रविवारी मुसळधार पाउस झाला. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं. पाण्याचा प्रवाह वाढला. त्या प्रवाहामुळे कराड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वाहून गेली होती. त्यामुळ गेली पाच दिवस पाणी पाणी करण्याची वेळ कराडकरांवर आली.

कराडकरांवरील पाणी संकटामुळं सर्वच राजकीय नेत्यांनी जुने पंपिंग स्टेशन कार्यान्वित करून पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोयना नदीपात्रात चुकीच्या पध्दतीने भराव घातल्याबद्दल तक्रारीही केल्या. त्याची तातडीने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी कराडमध्ये येवून पाहणी केली. दरम्यान आज याबाबत अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी कराड पालिकेचे सी ओ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आजपासून कराडात पाणीपुरवठा होईल असे वेध माझा शी बोलताना सांगितले


No comments:

Post a Comment