वेध माझा ऑनलाइन। रविवारी कोयना धारण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात पाच टीएमसीने वाढ झाली आहे. सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 38.28 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 36.37 टक्के भरले आहे. तर धरणात सहा तासांत 64 हजार 58 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक झाली आहे. तर नवजाला 185 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी सकाळपर्यंत नवजा येथे 162 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 147 आणि महाबळेश्वरला 138 मिलीमीटरची नोंद झाली होती. चोवीस तासात नवजा, कोयना, महाबळेश्वरमध्ये चांगले पर्जन्यमान झाले असून सायंकाळी आलेल्या आकडेवारीनुसार शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 122 तर नवजाला 185 आणि महाबळेश्वरमध्ये 52 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर मुसळधार पडलेल्या पावसामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा 38.28 टीएमसी झाला आहे.
No comments:
Post a Comment