जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत नवजा येथे सर्वाधिक 55 मिलीमीटरची नोंद झाली असून कोयनेत 44 आणि महाबळेश्वरला 31 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात 45.16 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे
जिल्ह्यातील प्रमुख असलेल्या सहा अशा धरणावर अनेक गावांच्या पाणी तसेच सिंचन योजनाही अवलंबून आहेत.सध्या छोटी धरणे भरु लागली आहेत. मात्र, मोठी धरणे भरण्यासाठी मुसळधार पावसाची अजून आवश्यकता आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके चांगली आलेली आहेत.
चार दिवसांपूर्वी तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळासह महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झाला मात्र, त्यानंतर उघडझाप सुरू होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा पाऊस वाढला आहे. तसेच धरणक्षेत्रातही पाऊस होत असल्याने साठा वाढू लागला आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला 2 हजार 131 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नवजाला 2 हजार 509 मिलीमीटर पाऊस पडला आहे.
No comments:
Post a Comment