Tuesday, July 30, 2024

राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत; पोलीस महासंचालक कार्यालयाने काढला आदेश ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत, असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने काढला आहे. 

राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या या आदेशात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना देत आहे.
दरम्यान , महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने प्रसिद्धी पत्रक काढून महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.


No comments:

Post a Comment