Thursday, July 25, 2024

माझी लाडकी बहीण योजनेत आणखी ६ बदल :

वेध माझा online ; 
राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजन सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावे, महिलांना जास्त त्रास होऊ नये यासाठी सरकार सतत नवनवीन बदल करत आहे. आताही सरकारने या योजनेत आणखी ६ बदल केले आहेत, ज्यामुळे अर्जदार महिलांचं काम आणखी सोप्प होणार आहे.

लाडकी बहीण योजनेत कोणकोणते बदल करण्यात आले?
१) आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरलं जाणार आहे.
२) एखाद्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
३) ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.
४) केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
५) नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
६) ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.

लवकरचे हे बदल लागू करण्यात होतील. याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळाली होती. सुरुवातील अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, मात्र सरकारने अनेक अटी आणि शर्थी काढून टाकल्यानंतर आता अर्ज प्रक्रिया सोप्पी झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय?
२१ ते ६५ वय वर्ष असलेल्या महिलांना अर्ज करता येईल
सदर महिला महाराष्ट्र रहिवासी असावी
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा कमी असावं
आवश्यक कागदपत्रे –
आधारकार्ड
रेशनकार्ड
रहिवासी दाखला
बँक पासबुक
अर्जदाराचा फोटो
अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
लग्नाचे प्रमाणपत्र



No comments:

Post a Comment