वेध माझा ऑनलाइन।
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १५० ते १६० जागा लढवण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली असून त्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गटाला किती जागा मिळणार हा प्रश्नच आहे. तसेच मुख्यमंत्री पदाबाबत आत्ताच कोणताही निर्णय घेण्यात येणार नसून निकालानंतरच याबाबत घोषणा करण्यात येईल असेही भाजपचं ठरल्याचं बोललं जात आहे.
अमित शाह यांच्या उपस्थितीत आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडणार आहे. यावेळी अमित शाह भाजप नेत्यांना काय संदेश देतात? कोणती रणनीती राबवण्यास सांगतात? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. लोकसभेत भाजपला चांगलाच फटका बसला होता, अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोड मध्ये आलं आहे. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीत १६०च्या खाली एकही कमी जागा लढवायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, दिल्लीतून १५५ ते १६० च्यामध्ये ग्रीन सिग्नल मिळेल असेही आशा भाजपला आहे.
No comments:
Post a Comment