Friday, July 26, 2024

जरांगे पाटील म्हणाले ; ठाकरे,पटोले, पवारांनी मराठा आरक्षणबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी ;

वेध माझा ऑनलाइन।
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैरोजी आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांनंतर म्हणजेच 24 जुलैरोजी त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं. त्यांनी येत्या 13 ऑगस्ट पर्यंत राज्य सरकारला वेळ दिला आहे. अशात त्यांनी  मविआ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा,असं जरांगे म्हणाले आहेत.
मविआ नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा..
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही, याबाबत उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा. त्यांनी विरोधकांची वाट बघू नये, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment