वेध माझा ऑनलाइन ।
मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी सकाळपासून कमी झाला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 47 हजार 799 क्युसेक आहे. गुरूवारपासून उघडलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहे. कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या कोयना धरणाची साठवण क्षमता 105 टीएमसी असून धरणात सध्या 83.50 टीएमसी पाणीसाठा आहे तर धरण 79.33 भरले आहे. धरणातून पाणी सोडल्याने जलपातळी नियंत्रित झाली आहे.
No comments:
Post a Comment