Monday, July 15, 2024

भुजबळ राहुल गांधींना भेटणार ; भुजबळांच्या मनात नेमकं काय चाललंय?

वेध माझा ऑनलाइन।
छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवारांच्या घरी जात छगन भुजबळ यांनी तासभर चर्चा केली. या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीतील मुद्दे सांगितले. राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला आहे. हे योग्य नाही. यात शरद पवारांनी लक्ष घालावं, असं सुचवल्याचं भुजबळांनी सांगितलं. या संघर्ष मिटवण्यासाठी गरज पडली तर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनाही भेटेन, असं छगन भुजबळ म्हणाले.

तर राहुल गांधी-मोदींना भेटणार- भुजबळ
मी तुम्हाला सांगतो, हा प्रश्न सोडवावा सुटावा, ओबीसी आणि मराठ्यांचा. तंग झालेलं वातावरण सुटावं यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. उद्या मला वाटलं की राहुल गांधींना भेटलं पाहिजे. किंवा पंतप्रधानांना भेटलं पाहिजे तर त्यांनाही भेटेल. कारण राज्यातील वातावरण शांत असलं पाहिजे,. गोरगरीबांची घरे पेटता कामा नये. एकमेकांच्या जीवावर कुणी उठता कामा नये, असंही भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे, अशी गरज छगन भुजबळ यांनी बोलून दाखवली.

No comments:

Post a Comment