कराड शहरात पावसाचा हाहाकार पहायला मिळाला सध्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे हा विसर्ग वाढला तर नक्कीच कराड मधे पुर परिस्थिति निर्माण होऊ शकते त्यामुळे सुरुवातीला पाणी ज्या ठिकाणी वाढ होऊन घरात घुस शकते अशा लोकांचे स्थलांतर योग्य ठिकाणी करण्यात येण्यासाठी यंत्रणा सज्जआहे प्रशासन अधिकार्यान्शी माझे बोलणे सुरु आहे संभाव्य पुर परिस्थितिशी दोन हात करण्याची तयारी म्हणून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे सुतोवाच डॉ अतुल भोसले यानी केले
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारील असणाऱ्या पाटन कॉलनी येथील परिस्थितिची पाहणी केल्यानतर ते माध्यमाशी बोलत होते
दरम्यान याठिकाणी मागील पावसाळ्यात पुरपरिस्थिति निर्माण होऊन लोकाना अडचणीचा सामना करावा लागला होता त्यामुळे सध्याची पाण्याची वाढती परिस्थिति पाहता त्याठिकाणी अशी पुरपरिस्थिति पुन्हा यावर्षी निर्माण झाल्यास संभाव्य उपाय योजना करण्याच्या दृष्टीने डॉ अतुलबाबा यानी या ठिकाणी भेट दिली व प्रशासनाला सूचना केल्या
ते पुढे म्हणाले मागील पुरपरिस्थिती चा आढावा मि प्रशासनकडून घेतला आहे त्या ठिकाणी कोणतिही अड़चन येवू नये म्हणून शहरातील नागरिक तसेच त्या ठिकानच्या नेत्यांकड़ून तेथे काय उपाययोजना करता येईल याबाबत अधिक विचार विनिमय करत आहोत प्रशासन देखील या परिस्थितिशी तोड़ देण्यासाठी सज्ज आहे असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment