Monday, July 22, 2024

सातारा जिल्ह्यात उद्याही होणार मुसळधार !

वेध माझा ऑनलाइन।
सध्या संपूर्ण राज्यामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने देखील अनेक जिल्ह्यांबाबत पावसाचा अंदाज व्यक्त केला असून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस अति मुसळधार वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 60.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील धरनातील पाणीसाठ्यात देखील वाढ होत आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 60.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याने 60 टीएमसीचा टप्पा गाठला आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात संततधार आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे धरणातील आवक वाढली आहे.
सोमवारी सकाळपर्यंत 24 तासांत जिल्ह्यातील नवजा येथे 236 मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून आतापर्यंत नवजाला 3 हजार 083 मिलमीटर पर्जन्यमान झाले. यामुळे नवजाच्या पावसाची तीन हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. कोयना येथे आतापर्यंत 2 हजार 569 मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही 24 तासांत 245 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

No comments:

Post a Comment