बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. ऐश्वर्या-अभिषेक ग्रे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच एक ग्रे घटस्फोटाची पोस्ट अभिषेक बच्चनने लाईक केली होती. यामुळे अभिषेक आणि ऐश्वर्या ग्रे घटस्फोट घेणार असल्याची शक्यता आहे. मात्र अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
ऐश्वर्या-आराध्या बच्चन कुटुंबापासून लांब
नुकताच आंबानी कुटुंबात अनंत आणि राधिका यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. त्या विवाहात अनेकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बच्चन कुटुंब हे चर्चेचा विषय ठरला. यावेळी ऐश्वर्याची भावजय श्वेता बच्चन देखील उपस्थित होती. तेव्हा बच्चन कुटुंबाने मिळून फोटो सेशन केलं. त्यावेळी ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या या बच्चन कुटुंबापासून वेगळ्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून सांगितलं जातंय की, श्वेता बच्चन ही पुन्हा बच्चन कुटुंबात आल्याने ऐश्वर्याने आपल्या मुलीसोबत आपल्या माहेरी राहणं पसंत केलं आहे. तसेच श्वेता बच्चन हिचे बच्चन कुटुंबात राहणे मुळात ऐश्वर्याला अजिबात पटत नसल्याचं देखील म्हटलं जातंय.
काय आहे ग्रे घटस्फोट?
अभिषेक बच्चनने ग्रे घटस्फोटाची पोस्ट सोशल मीडियावर लाईक केली. लग्नानंतर 10 ते 15 वर्षांनी एकत्र राहून घटस्फोट घेतात. सध्या वृद्धपकाळातही घटस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. हा ट्रेंड परदेशात असून आता भारतातही पाहायला मिळत आहे. याला ग्रे घटस्फोट म्हणतात.
No comments:
Post a Comment