Friday, July 26, 2024

कोयनेत पुन्हा पाऊस वाढला ; धरणात किती टी एम सी पाणी आहे ?

वेध माझा ऑनलाइन।
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात काल सायंकाळी पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळ कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणामध्ये ८२.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.काल सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने धरणातुन शनिवारी सकाळी ९ वाजता १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून नदीपात्रात ४० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे कृष्णा-कोयना नदीकाठी पुन्हा धोका वाढणार आहे.

No comments:

Post a Comment