वेध माझा ऑनलाइन।
सध्या कराड पालिकेचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे नॅशनल हायवे ठेकेदाराच्या गलथान कारभार यासाठी कारणीभूत मानला जातोय ज्या दिवशी पाणीविषयक समस्या शहरात उदभवली तेव्हापासून माजी नगरसेवक सौरभ पाटील लोकशाही आघाडीचे माजी अध्यक्ष श्री सुभाष पाटील यांनी मुख्याधिकारी खंदारे यांच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत त्या त्या ठिकाणची या दोन्ही नेत्यांनी पाहणी करत वेळोवेळी प्रशासनास सूचना केल्या तसेच सौरभ पाटील यांनी आपल्या मित्र परिवारासमवेत नागरिकांना टँकर्स द्वारे पाणी पोच करण्याची यंत्रणा राबवली . रुक्मिणी नगर, लाहोटी रो हाऊस, रुक्मिणी विहार, अशोक विहार, रणजित नगर, रुक्मिणी पार्क, रुक्मिणी गार्डन भाग 1,2 कमळेश्वर मंदिर, टिळक हायस्कूल जोतिबा मंदिर मागील परीसर येथे सौरभ तात्या यांच्या मित्रपरिवाराने पाणी वाटप करण्यात आले.
सौरभ पाटील मित्र परिवाराचे जयंत बेडेकर राकेश शहा विनायक पाटील (बंडा शेठ), विजय निकम, धीरज जगताप, इंद्रजित घोलप, निलेश पाटील, सचिन चव्हाण, सुमित पाटोळे, मनोज नायकवडी, श्रीनिवास शर्मा,यासाहित असंख्य युवक या पाणीवाटप मोहिमेत अक्षरशः जीव ओतून काम करताना दिसले
No comments:
Post a Comment