वेध माझा ऑनलाइन - थकित घरपट्टी पाणीपट्टी वसुलीसाठी कराड नगरपालिकेची धडाकेबाज मोहीम नुकतीच काढण्यात आली यामध्ये 16 नळ कनेक्शन कट करण्यात आले तर 3 गाळे सील करण्यात आले आहेत
दरम्यान शहरातील बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या वसुलीसाठी वेळप्रसंगी शहरातील काही प्रॉपर्टीचा लिलाव होणार असल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले


कराड नगरपालिकेने सन 2021 22 अखेरची थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली साठी धडाकेबाज मोहीम सुरू केली असून नगरपालिका कर वसुली विभागाने कारवाईचा बडगा उभारत 16 नळकनेक्शन कट केली तर 3 गाळे सील केले.यासाठी नगरपालिकेच्या वतीने पेठ निहाय पथके तयार केली असून या पथकांच्या माध्यमातून वसुली करण्याचे आदेश मुख्य अधिकारी रमाकांत डाके यांनी दिले आहेत. मिळकत धारकांना कर वेळेत भरण्याच्या वारंवार सूचना देऊनही अद्याप ज्यांनी कर भरलेला नाही अशा मिळकत आधारांवर धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली आहे. सदरची कारवाई कर निरीक्षक उमेश महादर जयवंत यादव सुरेश जाधव आयाज आतार जितेंद्र मुळे फिरोज मुजावर सुनील बसर्गी ईकलास शेख पांडुरंग सपकाळ राजेंद्र ढेरे फय्याज शेख व शिपाई यांनी पार पाडली कराड नगरपालिकेची घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण थकबाकी आठ कोटी 24 लाख 16 हजार इतकी आहे
दरम्यान शहरातील बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या वसुलीसाठी वेळप्रसंगी शहरातील काही प्रॉपर्टीचा लिलाव होणार असल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले
No comments:
Post a Comment