वेध माझा ऑनलाइन - काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोविड संबंधित त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोनिया गांधी यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment