Tuesday, May 2, 2023

मातोश्री ग्रुप च्या आरोग्य सेवेचे आमदार निलेश लंकेकडून कौतुक ; "मातोश्री' चे अध्यक्ष नवाजबाबा सुतार यांचीही केली " तारीफ ' म्हणाले... नवाजबाबा म्हणजे आरोग्यदूत..

वेध माझा ऑनलाइन - कराडच्या मातोश्री ग्रुपचा आदर्श घेऊन इतर सामाजिक संघटनांनी गरिबांच्या रूग्ण सेवेकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, मातोश्री ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा देणारे नवाजबाबा सुतार हे जणू आरोग्यदुतच आहेत असेच म्हणावे लागेल असे गौरवोद्गार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कराडात आले असता काढले 
शहरातील  मातोश्री ग्रुप च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मातोश्री क्लिनिक कन्सल्टिंग सेंटरच्या दुसऱ्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती  आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी मातोश्री ग्रुपच्या आरोग्य कामाचे कौतुक केले. 

याप्रसंगी दक्ष कराडकर ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद बापू पाटील, मनसेचे नेते दादासाहेब शिंगण, आमचे आधारस्तंभ अख्तर भाई आंबेकरी, युवा नेते प्रवीण पवार, युवा नेते शिवराज इंगोले, माजी नगरसेवक महेश कांबळे, दिलीप दादा घोडके, युवा नेते मुसद्दीक आंबेकरी, समाजसेवक प्रसाद पावसकर दादा, युवा नेते जावेद भाई नायकवडी, सैफ आतार, अभिजीत सूर्यवंशी, एनडी इनामदार, रफिक मोमीन, युवा नेते यासीन आतार, रहेबर ए जरिया फाउंडेशनचे वसीम शेख, अमीर साहब रमजान भाई मांगले कर, रियाज भाई आतार, कादर भाई नायकवडी, महेश पाटील, युवा नेते शोहेब भाई संदे, जब्बार शेख, डॉ.अनुश्री सुर्वे, डॉ. सोनाली थोरात, डॉ.अश्विनी सुपणेकर, डॉ.ऋतुजा थोरात, डॉ. मिलिंद पाटील, तोफिक मोमीन, महानंद काटेर, रोहित भोसले, अजित भोसले, गणेश खिल्लारे, चांदसाहेब निशाणदार नवाज इसाक सुतार, आसिफ भाई इबुशे, इमरान भाई मुजावर तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मातोश्री ग्रुपचे अध्यक्ष नवाज सुतार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment