Monday, May 1, 2023

शिवेंद्रराजेंनी दंड ठोकून दिला उदयनराजेंना इशारा ; 18 ; 0 ने सातारची बाजार समिती घेतील ताब्यात ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात अनेक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहे. या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का लागला आहे. तर काही नेत्यांनी आपले गड राखले आहेत. तर सातारा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली.


सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही खासदार उदयनराजे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा देऊन प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आज या बाजार समितीचे निकाल लागले आणि ही बाजार समिती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी एक हाती सत्ता मिळवत ताब्यात घेतली.
खासदार उदयनराजे भोसले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा दणदणीत पराभव करत 18-0 अशी बाजी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मारली.सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निघालेल्या मिरवणुकीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दंड थोपटून आणि वेगवेगळ्या पोझ देऊन विरोधकांना म्हणजेच खासदार उदयनराजेंना एक प्रकारे इशारा दिला आहे याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरदार सुरू आहे.

No comments:

Post a Comment