वेध माझा ऑनलाइन ; कराड बाजार समितीच्या निवडणुकीत सरंजाम प्रवृत्ती आणि प्रस्तापित प्रवृत्ती असणाऱ्याना मतदारांनी नाकारले आहे या दोन्ही प्रवृत्तीने मतदारांना कोंडीत धरण्याचा व मतदारांवर दबाव आणण्याचा वारंवार प्रयत्न केला असे विधान रयत संघटनेचे नेते ऍड उदयसिह पाटील यांनी नुकतेच केले कराड बाजार समितीच्या निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले
ते पुढे म्हणाले मतदारांचे स्वातंत्र्य या सरंजाम आणि प्रस्थापितांनी एकत्र येऊन दाबण्याचा प्रयत्न केला मतदारांना उचलून नेऊन डायरेक्ट मतदान करण्यासाठी त्यांना आणले गेले सर्वसामान्य जनतेला ताकद देऊन राजकीय प्रवाहात आणण्याची स्वर्गीय विलासकाकांची शिकवण आम्ही जोपासली आहे त्यांच्याच विचाराने आम्ही कारभार करणार आहोत या निवडणुकीत स्वार्थासाठी एकत्र आलेल्या सरंजाम आणि प्रस्थापित प्रवृत्तींना यापुढेही कुठेच थारा देऊ नका असे आवाहन ऍड पाटील यांनी यावेळी केले आपल्याला मदत करणाऱ्या अविनाशदादा ,मनोज घोरपडे, धैर्यशील कदम रामकृष्ण वेताळ, या सर्वांचे त्यांनी यावेळी धन्यवाद देत आभार मानले
No comments:
Post a Comment