वेध माझा ऑनलाइन। आमदार अपात्र प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्यांना कोर्ट समजते, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची व निवडणूक आयोगाची प्रत वाचली असेल, त्यावरून शिंदे हे अपात्र होऊ शकत नाहीत. परंतु, तो सर्वस्वी निर्णय विधानसभा अध्यक्षांचा आहे. शिंदे अपात्र झाले तरी काही अडचण नाही. विधान परिषदेवर ते निवडून येऊ शकतात.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या लढाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, १९८० साली मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली. १९८३ साली अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचा जीव त्यासाठी दिला. तेव्हापासून ही लढाई अजून तीव्र झाली. आज आम्ही ७० हजार उद्योजकांना ५ हजार कोटीचं कर्ज उपलब्ध केलं. त्याप्रमाणे २ लाख लोकांना रोजगार भेटले. मराठा समाजासाठी अनेक योजना सुरू केल्या. याचा परिणाम असा झाला की, मराठा नेत्यांना त्यांच्या समाजाची लोक विचारू लागली की, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. म्हणून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे.
No comments:
Post a Comment