वेध माझा ऑनलाईन। आ. महेश शिंदे आता सत्तेत आहेत ते अधिकाऱ्यांशी उर्मट भाषेत बोलतात अजून 10 महिने राहतील. सत्ता आहे म्हणून हे चालू आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या जिल्ह्यात एक मंत्री आहेत, त्याच्याकडे उत्पादन शुल्क खात आहे. त्यांच्याकडून दारूची दुकान वाढतायत अन् शाळा कमी होतायत अशी टीका सुप्रिया सुळे यांनी आ. महेश शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाईंवर केली
दरम्यान शिवसेना एकच आहे, त्याचे अध्यक्ष उध्दव ठाकरे हेच आहेत. तसचं राष्ट्रवादी पक्षाचं आहे, आमच्यातील एक गट बाजूला झाला. इलेक्शन कमिशन मध्ये शरद पवार स्वतः 5 तास बसून होते आई- मुलाचं नातं असतं, तसचं शरद पवार आणि राष्ट्रवादीचं नात आहे. कोणीही काही म्हणू द्या. राष्ट्रवादीचा बाप एकच...आणि तो म्हणजे शरद पवार...शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील दोन्ही माणसाच्यांत एकच साम्य आहे, ते म्हणजे हे सर्व मराठी आहेत. माझी लढाई या माणसांच्या बरोबर नाही, माझी लढाई या अदृश्य हाताबरोबर आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचे संस्कार आमच्यावर झाले आहेत स्व. यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून उपयोग होत नाही, संस्कार पाहिजेत. महाराष्ट्रात चव्हाण साहेबांचा फोटो कोणीही लावतं पण त्यांचा मानसपुत्र आणि राष्ट्रवादीचा बाप एकच आहे त्याचं नाव शरद पवार आहे असे त्या अजित पवार गटावर टीका करताना म्हणाल्या
No comments:
Post a Comment