Friday, October 27, 2023

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत? भाजपकडून व्हिडीओ ट्विट ; देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार?

वेध माझा ऑनलाइन। भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर Jअकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं बोलताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन’, अशी कविता म्हटली होती. त्याच घटनेचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप घडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जावून आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वीच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी दिल्लीत गुप्त बैठक झाली होती. या बैठकीचे तपशील समोर येऊ शकले नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर भाजपकडून हे ट्विट करण्यात आलंय. त्यामुळे भाजपला या ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.दरम्यान राज्यात यानिमित्ताने लवकरच राजकीय भूकम्प होण्याची शक्यता बोलली जात आहे आणि त्या व्हीडिओ मुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का ? अशी चर्चा देखील याचनिमिताने जोरदार सुरूही आहे...पाहूया पुढे काय होते ते !

No comments:

Post a Comment