Wednesday, October 25, 2023

शिंदे गटाच्या मेळाव्यात आलेल्या दोन एसटी बसला ट्रकची जोरदार धडक; २५ कार्यकर्ते जखमी..

वेध माझा ऑनलाइन। राज्यात काल (२४ ऑक्टोबर) या दिवशी मुंबई येथे २ दसरा मेळावे पार पडले. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर झाला. तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही सभांना चांगलीच गर्दी झाली होती. शिंदे गटाची सभा संपल्यानंतर राज्यातून अनेक बस भरुन आणण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही लोकं मराठवाड्यातून आली होती. तर शिंदे गटाचे नेते दादा भुसेंच्या सिल्लोड मतदारसंघातील असंख्य लोकं सभेसाठी आणली गेली होती. मात्र रात्री परतीच्या प्रवासाला शहापूरकडे जात असताना कळंभे गावाजवळ २ बसचा अपघात झाला. यात दादा भुसेंचे २५ कार्यकर्ते जखमी झाले आहेत असे समजते 

रात्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा संपल्यानंतर रात्री असंख्य लोकं परतीच्या प्रवासाकडे वाटचाल करू लागले. नाशिक महामार्गावरून शहापूरकडे जात असताना प्रवाशांचा बस अपघात झाला. यावेळी मागून एक ट्रक आला आणि त्या ट्रकने बसला ठोकर दिली. यावेळी दोन बस आदळल्या त्यातील एक बस ही रस्त्यावरील डीव्हायडर तोडून आदळली. हा अपघात शहापूरला जात असताना कळंभे गावाजवळ झाला आहे. या अपघाताने वाहतुककोंडी झाली होती. यामुळे इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला . दुखापतग्रस्तांना शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घडलेल्या दुर्घटनेवर मुंबई पोलिस निरीक्षकांनी याबाबत माहीती दिली आहे.

दसरा मेळाव्यानंतर विविध ठिकाणाहून लोकं आली होती. त्यातील काही लोकं ही दादासाहेब भुसेंच्या मतदारसंघातील होती. आपल्या घराकडे जाण्यासाठी लोकांनी रात्रीचे जेवण झाल्यानंतर परतीची वाट धरली होती. यावेळी कैक बस होत्या, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात कळंभे गावाजवळ झाला. यावेळी वाहतुककोंडी झाल्याने प्रवासासाठी अडथळे निर्माण झाले होते. दुखापतग्रस्तांवर शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातांची पोलिस ठाण्यात दखल घेण्यात आली असल्याची माहीती मुंबई पोलिस निरीक्षक अनंत पराडकरांनी दिली आहे. 


No comments:

Post a Comment