वेध माझा ऑनलाइन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (26 ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली होती. “शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना काय केले असा थेट सवाल त्यांनी सभेत विचारला होता. त्यावर, शरद पवार यांनी शनिवारी (28 ऑक्टोबर) मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन कृषिमंत्री असताना केलेल्या कामांची यादीच सादर केली. यावरून, भाजपनेही पवारांना प्रत्युत्तर दिले असुन “खोटे बोला पण रेटुन बोला,” अश्या शब्दांत टिका केली आहे. इतकेच नव्हे, तर “खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवले दिशाभूल करून वेठीस धरले अशीही पवारांवर टीका केली आहे. मोदी सरकारच्या पाठीशी शेतकरी 2014, 2019 पाठीशी राहिला आहे 2024 ला देखील पाठीशी ठामपणे उभे राहणार,” असे म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रच्या अधिकृत “X” अकाऊंटवरून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ह्या ट्विटमधून शरद पवार यांच्यावर टिका करताना 2014 आणि 2022 मधील शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळालेल्या हमीभावाची यादीही सादर केली आहे.
भाजपा महाराष्ट्रने ट्विट केले आहे की, “खोटं बोला पण रेटून बोला अशी भूमिका मा.शरद पवारांनी घेतलेली दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे मात्र शरद पवारांनी नेहमीच शेतकऱ्यांची दिशाभूल करत शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेठीस धरण्याचे काम केले आहे. पवारांना आरसा दाखवणे गरजेच आहे.”
“स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्याचे काम मोदी सरकारच्या कार्यकाळात झाले.”
शेतकऱ्यांचा शेतमालाला मिळालेला MSP
तांदळाला 2014 साली 1310 रुपये तर 2022 मध्ये 2040 रुपये इतका भाव मिळत होता. तर गव्हाला 2014 मध्ये 1400 रूपये तर 2022 मध्ये 2015 रुपये इतका भाव मिळत होता. सोयाबीन पिकाला 2014 मध्ये 2560 रुपये तर 2022 मध्ये 4300 रुपये इतका भाव मिळत होता, हे ट्विटमधून सांगितले आहे.
No comments:
Post a Comment