Sunday, October 22, 2023

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अजितदादांना बारामतीत युवकांचा घेराव ;

वेध माझा ऑनलाइन। मराठा आरक्षणासाठी आता मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची ठिणगी आता राज्यभरात वणव्याचे रुप घेत आहे. आज बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मराठा युवकांनी घेराव घातला. यावेळी अजित पवारांनी त्यांना आपली मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका समजवून सांगितली. 

बारामती तालुक्यातील पणदरे येथील सभा संपल्यानंतर मराठा  समाजाच्या युवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेराव घातला. यावेळी मराठा युवकांनी आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय असे विचारले. त्यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, कोणत्याही समाजाला धक्का न लगता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. वेगवेगळ्या घटंकाबरोबर मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली आहे. यामध्ये  माहिती घेतली असता मराठा समाजातील 10 पैकी 8 टक्के लोक हे  आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

No comments:

Post a Comment