वेध माझा ऑनलाइन। ढेबेवाडी मार्गावर कुसूर (ता. कराड) गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी रात्री १०. ३० त ११ वाजण्याच्या हा अपघात झाला. सुजल उत्तम कांबळे (वय- १७ वर्ष, रा. कोळेवाडी, ता. कराड) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या गाडीने या चौघांना उडवले आहे या गाडीवर शंकर खेतमर हा चालक होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या दिशेला जाताना अपघात झाला. दरम्यान चालक शंकर खेतमर दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.
No comments:
Post a Comment