वेध माझा ऑनलाइन। राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही सुळे यांनी केली.
राज्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी आज आमदार प्रकाश साळुंखे यांच्या घरावर आणि कार्यालयावर हल्ला केला. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या एका आमदाराच्या घरामध्ये जाळपोळ होतेय ही अतिशय गंभीर घटना घटना आहे. यावर राज्यातल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. माजलगावच्या पंचायत समितीमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली. हे राज्य सरकारचं अपयश आहे.
मराठा, धनगर आणि लिंगायत आरक्षणामध्ये फसवाफसवी सुरू असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची चौकशी करावी. राज्याच्या गृहमंत्र्यांना हे झेपत नाही, तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा.
No comments:
Post a Comment