वेध माझा ऑनलाइन। कराडातील मुजावर कॉलनी येथे आज सकाळी स्फोट झाला याबाबत गॅस लिकेज झाल्यामुळेच हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसानी वर्तवला आहे सध्या पुण्यातील फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत या मागचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कराडातील मुजावर कॉलनीतील झालेल्या स्फोटाबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात होते. यामध्ये बॉम्बस्फोटाची ही शक्यता वर्तवली जात होती. या स्फोटाची पूर्ण माहिती समोर येण्यासाठी पुण्याच्या फॉरेन्सिक टीमला बोलवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत याबाबतचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव यांच्यासह स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व पोलीस उप अधिक्षक अमोल ठाकूर, उपस्थित होते
No comments:
Post a Comment