Thursday, October 26, 2023

आमदार जयंत पाटील म्हणाले...काम माझे,...श्रेय घेतायत मोदी ...काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी देशाच्या विकास कामांसाठी परदेश दौरे करत होते. त्यांनी अनेक देशांमध्ये जावून तेथील विकास कामांची पाहणी केली होती. परदेशातील सोईसुविधा पाहुण भारतात देखील अशाच सोईसुविधा विकसित कराव्यात या उद्देशाने मोदी विदेश दौरे करायचे. विदेशातील व्यवस्था, यंत्रणांची पाहणी करत परदेशातील उद्योग मंत्री, विकास मंत्र्यांशी चर्चा करून भारतातील अनेक गोष्टी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता मोदी विदेश दौरे न करता देशातील महाराष्ट्र राज्यातील नाशिक, शिर्डी येथे जाणार आहेत. विकास कामांच्या पायाभरणी समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. याबाबत आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मौन सोडले आहे. निळवंडे धरणाच्या कालव्याबाबत  महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेल्या कामाबाबत जयंत पाटील यांनी सांगितले असून त्यांनी मोदींना टार्गेट केले आहे.

नरेंद्र मोदी नाशिकला येणार असून निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी आतापर्यंत झालेला खर्च आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या खर्चाबाबत सांगितले. जयंत पाटील म्हणाले, १९७० ते २०१९ या काळात ११०० कोटी एवढा खर्च झाला आहे. मात्र असे असले तरीही महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कालखंडात ९०० कोटींचा निधी मिळवून कालव्याचे ९० टक्के काम जलसंपदा मंत्री असताना केले होते. अशी माहीती जयंत पाटील यांनी दिली आहे. दुष्काळाच्या छायेत राहणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील गावांना अखेर दिलासा मिळणार आहे, याचा आनंद मला होत आहे. त्याचप्रमाणे कोरोना काळात राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार होता. तरीही विकास कामे आम्ही थांबवली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम आता एका टप्प्यात येवून थांबले आहे. अशी माहीती आता जयंत पाटील यांनी दिली. दरम्यान, कालव्याच्या विकासाची झालेली पाहणी करण्यासाठी नरेंद्र मोदी येणार आहेत. तर याबाबत आता जयंत पाटलांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा
जयंत पाटील हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात जलसंपदामंत्री होते. यावेळी जयंत पाटलांनी निळवंडे धरणाच्या कामासाठी प्राधान्य दिले होते. मात्र आता याचे सर्व श्रेय मोदी घेत आहेत, असे जयंत पाटलांचा आरोप आहे. यावेळी ते म्हणाले, मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे.

No comments:

Post a Comment