वेध माझा ऑनलाइन। सुषमा अंधारे यांनी थेट शंभूराज देसाई यांच्यावर नार्को टेस्टची मागणी केली होती त्यावेळी शंभूराज देसाई यांनी अंधारे विरोधात याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले होते त्यानुसार पाटण पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अब्रू नुकसानीचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांचे नाव ललित पाटील ड्रग्स प्रकरणाशी जोडले होते त्याचवेळी ललीत पाटील कोण हे मला माहित नाही. त्यांना मी ओळखत नाही, केवळ मंत्र्यांना बदनाम करणं त्यांची प्रतिमा खराब करणं हेच काम सुषमा अंधारे करत आहेत. त्यांनी त्यांच वक्तव्य 24 तासांत मागे घ्यावे अन्यथा त्यांनी कायदेशीर प्रक्रीयेला समोरं जाण्याची तयारी ठेवावी असं शंभुराज देसाई बोलले होते दरम्यान शंभुराज देसाई यांची बदनामी केल्या प्रकरणी पाटण तालुक्यातील सर्व धर्मीय-सर्व जातीय नागरीकांकडुन सुषमा अंधारे यांच्या विरोधात पाटण पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे ...आता पुढे काय होतंय हे पहावे लागणार आहे...
No comments:
Post a Comment