Tuesday, October 24, 2023

धनगर आरक्षणावरून पडळकरांच्या सांगली जिल्ह्यात युवकाची आत्महत्या ;

वेध माझा ऑनलाइन। राज्यात काही दिवसांपासुन मराठा समाज सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आहे. या आरक्षणासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. तर काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील एका ४५ वर्षीय आंदोलकाने मुंबईत आत्महत्या केली आहे. आता मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्यातील इतर समाजही आरक्षणाची मागणी करत आहेत. अशातच आता राज्यात आरक्षणासाठी धनगर समाज पेटून उठला आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाची मागणी करत असून  नेतृत्व करत आहेत. मात्र आता पडळकरांच्या सांगली जिल्ह्यात एका धनगर युवकाने आत्महत्या केली असल्याची माहीती समोर आली आहे. अबाचीवाडी, कुणीकोणूर ता.जत, जि.सांगली येथे मुळगावी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत पडळकरांनी ट्वीट करत धनगर समाजाला असे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे.

राज्यात काही दिवसांपासून आरक्षणाचा विषय अधिक पेटला आहे. मराठा समाजाने सरकारला आरक्षणाची मागणी केली होती. २४ ऑक्टोबरपर्यंत सरकार या मुद्यावर तोडगा काढणार असल्याच्या अधिक चर्चा होत्या. मात्र सरकारने यावर कोणताही तोडगा न काढल्यास मनोज जरांगे-पाटील उपोषण करणार आहेत. यापूर्वी मराठा समाजातील अनेक तरूणांनी आत्महात्या केली. तर हीच परिस्थीती आता धनगर आरक्षणाबाबत पाहायला मिळत आहे. गोपीचंद पडळकरांच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील धनगर आरक्षणावरुन तरूणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. बिरूदेव खर्जे असे आत्महात्या केलेल्या युवकाचे नाव असून वय ३८ वर्षे होते. त्याच्या सुसाईड नोटमध्ये त्याने धनगर आरक्षणावरुन आत्महत्या केली असल्याची माहीती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment