वेध माझा ऑनलाइन। कराड तालुक्यातील खुबी शेणोली आणि खोडशी या गावात आता मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय पुढार्यांना गावबंदी करण्याच्या मराठा समाजाने निर्णय घेतला आहे. तसेच शेणोलीत आनंदाचा शिधा नाकारण्याचा निर्णय झाला आहे
आरक्षणासाठी मराठा समाज एकवटू लागला आहे. दि. 25 पासून मनोज जरांगे- पाटील पुन्हा उपोषण करणार आहेत त्यांना पाठिंबा म्हणून अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेणोली या गावाने गावबंदी बरोबरच आनंदाचा शिधाही नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.कराड तालुक्यातील खुबी खोडशी बरोबरच पाटण तालुक्यातील नेरळे येथेही गावबंदी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment