Saturday, October 21, 2023

मोहीत कंबोज यांनी राखी सावन्तशी केली सुषमा अंधारेंची तुलना ; म्हणाले...सांगा या दोघींपैकी मोठी अभिनेत्री कोण ? बातमी...

वेध माझा ऑनलाइन। राज्यात काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात सावळा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांआधी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणाबाबत सरकारमधील दोन मंत्र्यांच्या नार्कोटेस्ट करा, अशी मागणी केली होती. दरम्यान १७ ऑक्टोबरला ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक करण्यात आली. यावर राज्याचे  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची तोंडं बंद करणार, असे वक्तव्य केले होते. यावर सुषमा अंधारेंनी यांनी, तोंड बंद करणार म्हणजे काय करणार? मारणार की मलिक, देशमुख, राऊतांसारखे अडकवणार? असा प्रतिसवाल केला. फडणवीस यांच्यानंतर आता भाजप नेते मोहीत कंबोज यांनीही सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. तोही एकदा नव्हे तर सलग दुसऱ्या दिवशीही.

सुषमा अंधारे या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या असून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर भाजपचे कान टोचत आहेत. यावरून आता भाजप वारंवार अंधारेंना टार्गेट करत आहे. फडणवीसांनी सगळ्यांची थोबाडं बंद होतील, असे वक्तव्य केले होते यावर अंधारेंनी धमकी समजायची काय असा सवाल केला. अशातच काल (२० ऑक्टोबर) भाजपचे नेते मोहीत कंबोज यांनी ‘सुषमा अंधारे का भी जल्द महुआ मोइत्रा होगा !’ असे ट्वीट केले होते.

कोण मोठी अभिनेत्री?

या प्रकरणाला इथेच पूर्णविराम मिळेल, असे वाटत होते, मात्र मोहीत कंबोज थांबायचे नाव घेत नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा अंधारेंबाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एका बाजूला अभिनेत्री राखी सावंत आणि दुसऱ्या बाजूला सुषमा अंधारें रडत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसाठी त्यांनी या दोघांमधील कोणती अभिनेत्री मोठी आहे? असा सवाल केला आहे. अंधारे यांना ट्रोल करण्यासाठी नेटकऱ्यांना आवाहन करत आहेत. म्हणून त्यांनी ट्रोलर्स आर वेलकम असे  कॅप्शन देखील दिले आहे.

No comments:

Post a Comment