वेध माझा ऑनलाइन । कराडमधील वेणूताई उपजिल्हा रुग्णालय येथे नवरात्रीच्या काळात जन्म घेणाऱ्या 13 मुलींचा व त्यांच्या मातांचा इनरव्हिल क्लब ऑफ कराडच्या वतीने बेबी किट देऊन तसेच त्या बालकांच्या मातांना साडी व पोषक आहार देऊन सत्कार करण्यात आला अशी माहिती इनर्व्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा सौ सीमा पुरोहित यानी दिली आहे
यावेळी सदर उपक्रमाबाबतची माहिती क्लबच्या एडिटर रूपाली डांगे यांच्या वतीने देण्यात आली त्याठिकाणी उपस्थित मातांची नावे अनुराधा टकले यांनी वाचून दाखवली.या उपक्रमासाठी वेणूताई उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शेडगे सर तसेच जानकर मॅडम, सायरा सिस्टर आणि इतर स्टाफ यांनी सहकार्य केले.
सदर कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षा सौ सीमा पुरोहित, सचिव डॉ अर्चना औताडे, ट्रेझरर शितल शहा, ISO नम्रता कंटक, एडिटर रूपाली डांगे, व्हाईस प्रेसिडेंट मंजुषा इंगळे, CC अनुराधा टकले, रुता चाफेकर, अंजली नावडीकर, श्रावणी घळसासी, अनुराधा पवार, आदिती पावसकर, पद्मजा इंगळे, सुजाता बेंद्रे, अश्विनी शेवाळे, मीरा गांधी,वासंती राजोपाध्ये उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment