वेध माझा ऑनलाइन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कराडमध्ये हिंदू एकता आंदोलन समितीकडून व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून 350 ढोल ताशा पथकासह 100 भगव्या ध्वजांची मानवंदना देण्यात आली. महाआरतीद्वारे या कार्यक्रमाची सांगता झाली या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले
हिंदू एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या संकल्पनेतून कराडातील दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 350 ढोल ताशा पथकासह 100 भगव्या ध्वजांची मानवंदना देण्यात आली.
या दिमाखदार सोहळ्यासाठी हजारो कराडकर उपस्थित होते. त्याचबरोबर तालुक्यातील सुमारे 430 गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित शिवभक्ताना भगवा फेटा परिधान करण्यात आला शिवतीर्थावर सुबक रांगोळी काढण्यात आली होती यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली यावेळी 350 ढोल ताशा वादकांनी आपले वादन याठिकाणी सादर केले त्यानंतर महाआरती ने कार्यक्रमाची सांगता झाली उपस्थितांनी आपल्या जागेवर उभे राहून व प्रज्वलीत दीपपणती हातात घेऊन ही महाआरती केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी शिवतीर्थ परिसर दुमदुमून गेला होता डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा हजारो शिवभक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला महाआरतीसाठी सुमारे 350 दाम्पत्यांनाविशेष निमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित महिलांचे ओटीभरण करण्यात आले. तसेच शिवप्रसादाचे वाटप देखील यावेळी करण्यात आले.
दरम्यान कराडमधील भवानी तांडव, जगदंब, अप्टगंध, विजेता, रूद्र ब्रम्हांड, श्रीमंत भैरवनाथ या ढोल ताशा पथकांच्या वादकांनी याठिकाणी सहभाग घेतला होता.350 वादकांच्या ढोल वादनाने व शिवछत्रपतींच्या जयजयकाराने दत्त चौक परिसर अक्षरशः शिवमय झाला होता
No comments:
Post a Comment