वेध माझा ऑनलाइन । देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं खळबळ माजली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानींकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैसे न मिळाल्यास जीव घेऊ असं अंबानींना धमकावलं आहे. त्यामुळे मुकेश अंबानींची सुरक्षा आणखी चोख करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबरला मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर एका अज्ञात आयडीवरून ईमेल मिळाला आहे. त्यात मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिलंय की, If you don’t give us 20 Crore rupees, we will kill you, we have the best shooter in India’ हा ईमेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सिक्युरिटी इन्चार्जच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम ३८७, ५०६(२) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
No comments:
Post a Comment