Thursday, October 26, 2023

कांदा महागला ! टोमॅटो नंतर आता कांदा काढतोय डोळ्यातून पाणी !

वेध माझा ऑनलाइन। देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी आकाशाला टेकलेल्या टोमॅटोचा भावामुळे प्रत्येक सामान्य माणसाची झोप उडाली होती. 200 रुपये किलोवर पोहोचलेला टोमॅटो हा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा होता, टोमॅटो नंतर आता कांदा देखील या शर्यतीत सामील झाला असून त्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. देशातील राजधानीत कांदा हा 50 ते 60 रुपये किलोने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी ज्याची किंमत केवळ 30 ते 40 रुपये होते त्यात आता अचानक वाढ झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसात यात अजून वाढत होऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

कांदा हा आपल्या घरातील एक सर्वात महत्त्वाचा असा घटक आहे. कुठल्याही शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणात कांद्याशिवाय विशेष चव ही येतात नाही, देशातील प्रत्येक रहिवासी हा कांदा विकत घ्यायला आतुर असतो. कांद्याची गरज जाणून सरकारने देखील त्याचे दर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता, सरकारच्या बफर स्टॉप मधून कांदा विकला जाण्याची घोषणा करण्यात आली होती. मागे सरकारचा असलेला केवळ उद्देश म्हणजे देशातील सर्वसामान्य ग्राहकांना परवडणाऱ्या भावांमध्ये कांद्या विकत घेता यावा. बरोबरच सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क ही लावले होते, सरकारकडून याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करूनही कांद्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. आणि चिंतेची बाब म्हणजे कांद्याच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

No comments:

Post a Comment