Friday, October 27, 2023

कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांचा सातारा भूषण पुरस्काराने गौरव ;

वेध माझा ऑनलाइन। आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, मुंबई यांच्यावतीने सन २०२३ साठीचा दिला जाणारा बँकिंग विभागातील गौरवास्पद कार्याबद्दलचा सातारा भूषण पुरस्कार कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांना नुकताच प्रदान करण्यात आला

सोमवार दि. २३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्ट शिवाजी मंदिर सभागृहामध्ये सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी व अध्यक्ष डॉ. सुभाष एरम हे उपस्थित होते.

सीए. दिलीप गुरव हे सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बँकींग विषयी मार्गदर्शन करत असतात. तसेच त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच सहकार खाते यांच्याद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांना देखील निमंत्रित प्रशिक्षक म्हणून सहभागी बँकांना मार्गदर्शन करत असतात. बँकींग क्षेत्रात केलेल्या याच कार्याचा सन्मान म्हणून त्यांना सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्याबद्दल दिलीप गुरव यांचे कराड अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, सर्व संचालक, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि सेवक यांनी अभिनंदन केले. तसेच बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment