Tuesday, October 24, 2023

मंत्रालय IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा; ६ महिन्यात १३३ वेळा बदल्या

वेध माझा ऑनलाइन। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कैलास पगारे यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. सचिन्द्र प्रताप यांची बदली आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. अजित बी. पवार यांची दुग्ध विकास विभागात आयुक्त म्हणून बदली झाली. एस. जी. कोलते यांची पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. सुधाकर तेलंग यांची शिधावाटप नियंत्रक व संचालक नागरी पुरवठा, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात सहा महिन्यात ११३ वेळा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

‘नवी विटी, नवा डाव’ याप्रमाणे कोणतेही सरकार बदलले तर ते आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागी घेते. तर इतरांना साईडच्या पोस्ट दिल्या जातात. जुलै २०२२ मध्ये राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. या सरकारने आधीच्या सरकारचा बदल्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे.
२ मे २०२३ रोजी १९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. २ जून २०२३ रोजी राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ७ जून २०२३ रोजी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या महाविकास आघाडीच्या काळात झाल्या होत्या. त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारनेही आधीच्या सरकारची री ओढत २१ जुलै २०२३ रोजी राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सरकारने १८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. २३ ऑगस्ट रोजी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment