वेध माझा ऑनलाइन। शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. असे असताना शिवसेना शिंदे गटात काही महिन्यापूर्वी गेलेले शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा स्वगृही परतले आहेत. शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे शहापूरमध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा मजबूत झाली. सव्वा वर्षापूर्वी 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले होते. राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात फारसे काही पदरी पडले नसल्याने ते स्वगृही परतले आहेत. पण राष्ट्रवादीत परतून बरोरा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केल्याचे बोलले जाते.
उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले. आमिषे, पोलिसांचा दबाव टाकून शिंदे गटाने आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी पळवले, असा आरोप ठाकरे गटाने वारंवार केला. एकनाथ शिंदे गटात दर आठवड्यात शिवसेनेसह इतर पक्षातून इनकमिंग जोरात सुरू असतानाच, शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदे गटाला रामराम करत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला होता. एकेकाळी शिवसेनेचे आमदार असणाऱ्या दौलत दरोडा यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट न दिल्याने ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहत आमदार झाले. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेले होते. त्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात फारसे काही पदरी पडले नसल्याने ते स्वगृही परतले आहेत. पण राष्ट्रवादीत परतून बरोरा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केल्याचे बोलले जाते. दरम्यान, राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेले दौलत दरोडा आता अजित पवार गटात आले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदार संघात मोठाच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि दौलत दरोडा यांचे पटत नाही. त्यामुळे जर युती झाली तर दरोडा यांच्यासाठी शिंदे गट प्रचार करतील का, हा सवाल उपस्थित होत आहे.
शहापूर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (आदिवासी) राखीव आहे. या मतदार संघात कॉंग्रेस चारवेळा, शिवसेना तीनदा, राष्ट्रवादी कॉँग्रेस दोनदा निवडून आले तर एकदा शेतकरी कामगार पक्षाचा आमदार झाला तर एकदा अपक्ष आमदार निवडून आला आहे
इतिहास शहापूर विधानसभेचा
या मतदार संघात 1976 मध्ये अपक्ष पी.आर. पाटील निवडून आले. 1972मध्ये कॉँग्रेसचे श्रीरंग शिंगे विजयी झाले. 1978 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कृष्णकांत तेलंग आमदार झाले. 1980 ते 1990 असे सलग तीन वेळा कॉँग्रेसचे महादू बरोरा आमदार झाले. त्यानंतर 1995 ते 1999 मध्ये दौलत दरोडा हे शिवसेनेचे आमदार झाले. 2004 मध्ये महादू बरोरा आमदार झाले. यांनी या मतदार संघाचे नेतृत्व तीनदा कॉँग्रेसकडून तर एकदा राष्ट्रवादीकडून केलेले आहे. 2009 मध्ये शिवसेनेचे दौलत दरोडा आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये पांडुरंग बरोरा आमदार झाले. 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट न दिल्याने दौलत दरोडा राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले.
No comments:
Post a Comment