Saturday, October 21, 2023

दसऱ्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाणार; ...कोण म्हणाले ...? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन। भाजप नेते नितीश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणाचा तपास पुढे सरकत आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे हे परदेशात पळून जाणार असल्याची माहिती मला समजली असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे. 

जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियाने हीने देखील आत्महत्या केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. 

आज पत्रकारांसोबत संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी  म्हटले की, दसरा मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे देश सोडून जाणार आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणातील अटक टाळण्यासाठी आदित्य हे पाऊल उचलणार आहेत असेही राणे यांनी म्हटले. 

ठाकरे गटाचे आणखी एक खासदार संजय राऊत यांना ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात अटक होईल अशी भीती का वाटते, असा सवाल त्यांनी केला आहे. सुषमा अंधारेंना आता भीती वाटायला लागली आहे.  ललित पाटील याला अटक झाल्यावर राऊत यांना पुन्हा अटक होईल असे वाटत आहे असा प्रश्न त्यांनी केला. ललित पाटीलला भांडुप ते नाशिक कोण गाडीत घेऊन जायचं? आता या प्रकरणातील सर्व बाहेर येणार आहे म्हणून अटकेची भीती राऊतांना वाटत असून कैदीचे कपडे घालून लवकर आर्थरोड जेलमध्ये ते दिसतील असे राणे यांनी म्हटले. 

दिशा सालियन आत्महत्येच्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात या प्रकरणी खोटं शपथपत्र दाखल केल्याचा आरोप मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास अजून संपला नाही. दिशाचा मृत्यू ज्या वेळी झाला होता त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मोबाईलच त्याच परिसरात कसा काय होता असा सवालही याचिकेतून विचारण्यात आला आहे. 


No comments:

Post a Comment