वेध माझा ऑनलाइन। निवडणुका लागलेल्या पाच राज्यांत भाजपला लोक बाजूला करतील, असे चित्र आहे. देशात ७० टक्के राज्यांत भाजप नाही. निवडणुका आहेत, तेथे कौल भाजपच्या विरोधात दिसून येत आहे, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.
रविवारी बारामती दाैऱ्यावर आलेले शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच ५१ टक्के मते घेऊन आम्ही बारामती जिंकणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वारंवार म्हणत असतात. याबाबत पवार म्हणाले, ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं काहीही कारण नाही.
प्रश्न सुटला, तर आनंदच
पवार म्हणाले की, जरांगे पाटील आणि सरकारमध्ये काही सुसंवाद झाल्याचे व सरकारने वेळ घेतल्याचे दिसते. याबाबत सरकार काय करते आहे, याकडे आमचे लक्ष आहे. यातून मार्ग निघाला, प्रश्न सुटला तर मनापासून आनंद होईल, असे शरद पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment