लायन्स क्लबच्या व्हिजन व चाइल्ड कॅन्सर आणि पर्यावरण या सारख्या विषयांमध्ये कृष्णा हॉस्पिटल सहयोगी काम करण्यास तयार आहे असे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी केले
लायन्स क्लब ऑफ कराड मेन च्या पदग्रहण सोहळा प्रसंगी ते बोलत होते दरम्यान यावेळी संजय पवार यांची कराड मेन यांच्या सन 2024 25 साठीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली
लायस क्लब ऑफ कराड मेनच्या पदग्रहण सोहळा कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले पदप्रदान अधिकारी माजी प्रांतपाल सुनील सुतार माजी प्रांतपाल एम एस एफ पांडुरंग शिंदे लायन राजेंद्र मोहिते रिजन चेअरमन लायन्स दिलीप वहाळकर झोनचे चेअरमन लायन्स डॉक्टर निलेश थोरात कराड मेन माजी अध्यक्ष लायन खंडू इंगळे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉक्टर सुरेश भोसले पुढे म्हणाले लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात याचा अभिमान वाटतो 100 वर्षापेक्षा जास्त काळ सातत्याने समाजसेवेची नाळ या क्लब ची जोडली गेली आहे 200 पेक्षा अधिक देशांमध्ये या संघटनेचे काम चालू आहे हेही अभिमानास्पद आहे आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये मलाही काही गोष्टी शिकता आल्या आपल्या क्लब मध्ये असणारी टेमर व टीम ट्विस्टर ही पदे आमच्या कृष्णामध्येही असली पाहिजेत असे आता माझे ठाम मत झाले आहे
दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पवार यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा देत सुरेश भोसले म्हणाले संजय पवार यांच्या कारकिर्दीमध्ये यापुढे जॉईंटली काम करण्यासाठी कृष्णाच्या माध्यमातून आपण सुरुवात करूया...
दरम्यान प्रांताचे माजी प्रांतपाल पी एम जे एफ लायन सुनील जी सुतार यांनी नूतन अध्यक्ष संजय पवार व त्यांच्या टीमला प्रोटोकॉल प्रमाणे शपथ प्रदान केली
No comments:
Post a Comment