Thursday, July 11, 2024

कराडच्या हौसाई विद्यालयाचा 38 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा ; हौसाई विद्यालयाने विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कारांची जोड दिली; अध्यक्ष राजाभाऊ पाटील यांचे प्रतिपादन :


वेध माझा ऑनलाइन।
कराडच्या कोल्हापूर नाका येथील हौसाई विद्यालयाचा 38 वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री ऍड राजाभाऊ पाटील तसेच मॉर्डन कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या जोशी मॅडम, शामराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य फुके सर आदि मान्यवर उपस्थित होते 

यावेळी बोलताना राजाभाऊ म्हणाले... हौसाई विद्यालय यावर्षी 39 व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. 11 जुलै 1986 रोजी या विद्यालयाची स्थापना झाली सुरुवातीला ही शाळा कन्याशाळा या नावाने सुरू होती परंतु कै. विलासराव पाटील काका व आदरणीय जयसिंगराव पाटील बापू यांच्या तळमळीच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनीना उच्च दर्जाचे शिक्षण मिळालं पाहिजे या प्रमुख हेतू समोर ठेवून यातूनच हौसाई विद्यालय म्हणून ही शाळा पुढे नावारूपास आली आजपर्यंत या विद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आज डॉक्टर, इंजिनीयर, प्राध्यापक अशा मोठ्या हुद्यावर कार्यरत असल्याचे पहायला मिळते याचा नक्कीच अभिमान वाटतो अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिकून शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला स्वाभिमान जतन करत आपले करिअर उभे केले याचाही अभिमान आहे हौसाई विद्यालयाने विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कारांची जोड दिल्याने विद्यार्थी समाजामध्ये आदर्शवत कार्य करत आहेत. 
यावेळी ग्रंथ प्रदर्शन, जिजाऊ वस्तीग्रह कोळे येथील मुलांना ड्रेस वाटप, खाऊ वाटप आदी उपक्रम राबवले गेले दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरेश वेदपाठक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमास कल्याण कुलकर्णी, मुंडे सर, पद्मावती पाटील, अंजना जानुगडे, धनाजी पाटील, विकास शिंगाडे, किरण शिंदे तसेच हौसाई शैक्षणिक संकुलातील सर्व शाखातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment