कराड येथील कोयना सहकारी बँकच्या प्रशासकिय कार्यालयाचे उदघाटन व त्याच बँकेच्या आवारात माजी मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवार, दि. १५ जुलै रोज़ी दुपारी २ वाजता होणार असल्याची माहिती अँड उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हा अनावरण सोहळा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांचे हस्ते होणार आहे. तर कोयना बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उदघाटन माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे असणार आहेत. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत
No comments:
Post a Comment