Thursday, July 11, 2024

राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार :

वेध माझा ऑनलाइन।
काँग्रेस खासदार आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत. अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात असताना आता राहुल गांधी सुद्धा या वारीत चालताना आपल्याला दिसतील. राहुल गांधी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतील. राहुल गांधी वारीत वारकऱ्यांशी संवाद साधण्याची सुद्धा शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी आषाढी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. शरद पवार यांनीही राहुल गांधीना वारीचं महत्व पटवून देत या वारीत सहभागी व्हा असं आवाहन केलं होते. अखेर राहुल गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते पहिल्यांदाच वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधीं13 किंवा 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असे सांगण्यात येत होते. आता मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी 14 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना १४ जुलैला राहुल गांधी वारीत पाहायला मिळतील.

No comments:

Post a Comment